Marijuana

Marijuana : अबब…. पुण्यात सापडला 36 किलो गांजा; महाविद्यालयीन तरुणाला अटक

689 0

पुणे : गडचिरोलीवरुन विक्रीसाठी आणलेला 36 किलोचा गांजा (Marijuana) पुण्यात पोलिसांनी जप्त केला आहे. गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गांजाची (Marijuana) किंमत जवळपास 7 लाख 27 हजार 200 रुपये आहे. हा गांजा अंमली पदार्थ खंडणी विरोधी 1 च्या पथकाने हस्तगत केला आहे.

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये आला नवा ट्विस्ट; ‘त्या’ कॉलने वाढवला सस्पेन्स

पोलिसांना 18 जून रोजी अंमली पदार्थ खंडणी विरोधी पथकाला एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत तरुणाला ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेला तरुण महाविद्यालयीन असून त्याचे नाव पंकज सलियार मडीवा (वय- 23 वर्ष) तो मूळचा कोचरी गडचिरोली येथील आहे. पण पुण्यात सध्या तो शिवगोरक्ष व्हिला,आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे राहत होता.

Adipurush : ‘आदिपुरुष’च्या स्क्रिनिंगदरम्यान थिएटरमध्ये राडा; बंद पाडण्यात आला शो

मिळालेल्या माहितीनुसार, त्याने दोन वेळा गांजा (Marijuana) विक्रीसाठी आणला असल्याची माहिती आहे. पुणे शहरात वाढत असलेल्या अंमली पदार्थ विक्रीला वचक बसवण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांनी खडक पोलीस स्टेशनला निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी देखील तपासाचा वेग वाढवला आणि अनेक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालणारे खंडणी विरोधी एक पथकाचे पोलीस अंमलदार विजय कांबळे यांना एक तरुण आंबेगाव येथील एव्हिएशन कॉलेजसमोर मोठ्या प्रमाणात गांजा (Marijuana) विक्रीसाठी आणणार आहे अशी बातमी मिळाली. त्यानुसार खंडणी एक विरोधीच्या पथकाने सापळा रचत तरुणाला ताब्यात घेतले. सदर तरुणावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन करत आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide