Jayant Patil

Jayant Patil : जयंत पाटील भाजपात जाणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा

872 0

पुणे : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) भाजपच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) हे केवळ रडण्याचे नाटक करत होते असंही शिरसाट यांनी म्हंटलं आहे.

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये आला नवा ट्विस्ट; ‘त्या’ कॉलने वाढवला सस्पेन्स

‘राष्ट्रवादीला आमची एवढी काळजी का वाटत आहे. हेचआम्हाला कळत नाही. स्वतः जयंत पाटील आज भाजपच्या वाटेवर आहेत. ते आम्हाला सांगतात आमच्या पक्षाची स्थापना गद्दारीतून झाली आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्यासोबत केलेली गद्दारीतुन निर्माण झालेले हे सर्व लोकं आता आम्हाला गद्दारीची भाषा शिकवत आहेत. हा सर्व प्रकार अत्यंत हास्यास्पद आहे. असंही संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे.

Auto Pay : ऑटो पे वापरताय…? जाणून घ्या काय आहेत फायदे आणि तोटे ?

यावेळी बोलतांना संजय शिरसाट म्हणाले की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा, जयंत पाटील प्रचंड भाऊक झाले होते. ‘जयंत पाटील एवढे का रडत होते, तुम्हाला माहीत आहे का? कारण त्यांना माहीत आहे, उद्या काय घडणार आहे. शरद पवार साहेब तुम्ही राजीनामा दिला तर मी काय करू? म्हणून जयंत पाटील (Jayant Patil) केवळ रडण्याचे नाटक करत होते असे रडणारेच आधी उड्या मारतात असा टोलाही त्यांनी लगावला.

Share This News
error: Content is protected !!