FIR

एनडीएतील उच्च पदस्थ अधिकार्‍याला डांबून ठेवत केली मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

685 0

पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये कौटुंबिक वादातून एनडीएतील उच्चपदस्थ अधिकार्‍याला निवृत्त न्यायाधीश पत्नी, निवृत्त कर्नल सासरे यांच्याकडून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीप्रकरणी आरोपीविरोधात उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्या अधिकार्‍याला राहत्या घरात डांबुन ठेवत नोकरी घालविण्याची धमकीदेखील दिली असल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

या प्रकरणात यापूर्वी पत्नीने देखील मेजर असलेल्या पती विरोधात छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी उच्च पदस्थ पदावर असलेल्या अधिकार्‍याने दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या पत्नीसह सासु-सासर्‍यांवर मारहाण, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे एनडीएमध्ये मेजर आहे. तर पत्नी असलेल्या महिला या स्वेच्छा निवृत्त न्यायाधीश असून त्या एका लॉ कॉलेजमध्ये प्राध्यपकाचे काम करतात. तर त्यांचे वडील हे निवृत्त कर्नल आहेत. डिसेंबर 2022 मध्ये पती-पत्नीचा कौटुंबिक वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि सासु-सासर्‍यांनी फिर्यादी यांना राहत्या घरात डांबुन ठेवले. त्यांना कामावर जाण्यास अटकाव केला. तसेच जोरजोराने आरडाओरडा करत शिव्या देत त्यांची नोकरी घालवण्याची व कोर्ट मार्शल करण्याची धमकी देत मारहाण केली असे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. गुन्हे निरीक्षक शबनम शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!