FIR

एनडीएतील उच्च पदस्थ अधिकार्‍याला डांबून ठेवत केली मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

623 0

पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये कौटुंबिक वादातून एनडीएतील उच्चपदस्थ अधिकार्‍याला निवृत्त न्यायाधीश पत्नी, निवृत्त कर्नल सासरे यांच्याकडून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीप्रकरणी आरोपीविरोधात उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्या अधिकार्‍याला राहत्या घरात डांबुन ठेवत नोकरी घालविण्याची धमकीदेखील दिली असल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

या प्रकरणात यापूर्वी पत्नीने देखील मेजर असलेल्या पती विरोधात छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी उच्च पदस्थ पदावर असलेल्या अधिकार्‍याने दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या पत्नीसह सासु-सासर्‍यांवर मारहाण, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे एनडीएमध्ये मेजर आहे. तर पत्नी असलेल्या महिला या स्वेच्छा निवृत्त न्यायाधीश असून त्या एका लॉ कॉलेजमध्ये प्राध्यपकाचे काम करतात. तर त्यांचे वडील हे निवृत्त कर्नल आहेत. डिसेंबर 2022 मध्ये पती-पत्नीचा कौटुंबिक वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि सासु-सासर्‍यांनी फिर्यादी यांना राहत्या घरात डांबुन ठेवले. त्यांना कामावर जाण्यास अटकाव केला. तसेच जोरजोराने आरडाओरडा करत शिव्या देत त्यांची नोकरी घालवण्याची व कोर्ट मार्शल करण्याची धमकी देत मारहाण केली असे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. गुन्हे निरीक्षक शबनम शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Crime

वीस वर्षांच्या मैत्रीचा निर्घृण अंत! आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याने मेव्हण्याने केला मित्र असलेल्या दाजीचा खून

Posted by - July 10, 2024 0
वीस वर्षांपासून मित्र असलेल्या मित्रानेच बहिणीशी आंतरधर्मीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून मेव्हण्याने बहिणीच्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड…
Pune Crime Video

Pune Crime Video : पुण्यातील खराडी परिसरात टोळक्याकडून गाड्यांच्या जाळपोळीसह महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Posted by - February 19, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime Video) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये गाडी पार्क करण्याच्या किरकोळ झालेल्या वादातून तरुणाला…
Breaking News

BREAKING NEWS : दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Posted by - February 14, 2023 0
नवी दिल्ली : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. हा छापा टाकल्यानंतर कार्यालयातील सर्व अधिकारी…
Palghar Accident

Palghar Accident : मारुती स्विफ्ट आणि बुलेटमध्ये भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Posted by - December 6, 2023 0
पालघर : राज्यात अपघाताचे (Palghar Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार येथे भीषण अपघाताची घटना…

आरोपीला पोलीस कोठडी, पोलिसांचं निलंबन, ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती… बदलापूर अत्याचार प्रकरणात आत्तापर्यंत काय काय घडलं ?

Posted by - August 21, 2024 0
संपूर्ण देश महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये होरपळत असताना बदलापूर मध्ये देखील अशीच घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र खळबळून जागा झाला.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *