Pune Prashasan

आईचा मृतदेह घेऊन लेक सहा तास फिरला; पुण्यातील धक्कादायक प्रकार आला समोर

34655 0

पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेवरून प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील चाबुकस्वार कुटुंबाबाबत. मृतदेह सकाळपर्यंत शवगृहात ठेवण्यासाठी चाबुकस्वार कुटुंबाला जवळपास सहा तास रिक्षामध्ये आईचा मृतदेह घेऊन फिरावे लागले होते. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पुण्यातील अक्षय चाबुकस्वार यांच्या आईचं निधन पटेल रुग्णालयात झाले. त्यावेळी मृतदेह नेण्यासाठी रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध होती मात्र चालक नव्हता. त्यामुळे त्यांचा मृतदेह शवगृहात ठेवावा यासाठी त्यांनी चक्क रिक्षा करून आईचा मृतदेह रिक्षात घेऊन जात जवळ असलेल्या कॅटॉनमेंट बोर्डच्या रुग्णालयात नेण्याचं ठरवले. त्यामुळे रिक्षातून त्यांनी मृतदेह आणला. मात्र, तांत्रिक कारणाने कॅटॉनमेंटचे शवागृह बंद होते.

यामुळे त्यांना ससून रुग्णालयात मृतदेह हलवावा लागला. या घटनेवरून पुण्यातील आरोग्य यंत्रणांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या घटनेने सगळीकडे संताप व्यक्त केला जात असून प्रशासन यावर काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!