Breaking News
Vaari

वारीमध्ये मुस्लीम व्यक्तीने धरला विठ्ठलाच्या भजनावर ठेका

584 0

मुंबई : येत्या 29 जूनला आषाढी एकादशी आहे. यानिमित्त महाराष्ट्रातून अनेक वारकरी पायी वारी करत पंढरपुरात दाखल होत असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल भक्त पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे. वारकरी भजन, भक्तिगीते आणि अभंग गीते म्हणत विठ्ठलाची आराधना करताना दिसत आहे.सध्या सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
वारी वर्षानुवर्षांपासून चालणारी महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या वारीत जातिभेद किंवा धर्मभेद नसतो. येथे फक्त विठ्ठलाचे भक्त वारकरी असतात. सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये एक मुस्लीम व्यक्ती एका वारकरी बांधवासोबत विठ्ठलाच्या भजनाच्या तालावर नाचताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल की वारकरी बांधवासोबत हा मुस्लीम व्यक्ती फुगडीसुद्धा खेळताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. जात-धर्म बाजूला ठेवून मुस्लीम व्यक्ती वारीचा आनंद घेताना दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून माणुसकी हाच खरा धर्म आहे असा संदेश सगळ्यांना पोहोचण्यास मदत होईल. हा व्हिडिओ लोकांना खूपच आवडला असून अनेक लोक तो शेअर करताना दिसत आहेत.

Share This News
error: Content is protected !!