Nick Jonas

निक जोनासने पहिल्यांदाच शेअर केला लाडक्या लेकीचा फोटो; नेटकरी म्हणाले…..

486 0

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही (Priyanka Chopra) सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. प्रियांकाच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत असते. आता प्रियांकाच्या लेकीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती निक जोनाससोबत (Nick Jonas) दिसत आहे.

निक जोनासने पहिल्यांदाच शेअर केला मालतीचा फोटो
प्रियांका चोप्रा नेहमीच सोशल मीडियावर तिच्या लाडक्या लेकीचे फोटो शेअर करत असते. पण खूप कमी फोटोंमध्ये ती तिच्या लेकीचा चेहरा दाखवत असते. पण आता निक जोनासने पहिल्यांदाच मालती मेरीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. निक आणि मालतीचा फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. निक जोनासने शेअर केलेल्या फोटोत त्याने काळ्या रंगाचा प्रिंटेड-शर्ट परिधान केला आहे. तर मालतीने निळ्या रंगाचा फ्रॉक परिधान केलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत निकने एक हार्ट इमोजीदेखील शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी आता कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.

Share This News
error: Content is protected !!