Beed Warkari

वारकऱ्यांच्या दिंडीचा अपघात ! दिंडीत रिक्षा घुसल्याने अनेक वारकरी जखमी

810 0

बीड : जळगाव जिल्ह्यातील रावेरहून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीचा बीडमध्ये अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन वारकरी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये जालना रोडवर विरुद्ध दिशेने येणारी एक रिक्षा अचानक दिंडीमध्ये घुसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. रिक्षा चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी क्षा चालकाला चोप देत रिक्षाची तोडफोड केली. या अपघातातील जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. यावेळी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन वारकऱ्यांना मदत केली आहे. जखमींमध्ये एक पत्रकार आणि वारकरी यांचा समावेश आहे. जखमींवर सध्या काकू नाना हॉस्पिटल (Kaku Nana Hospital) आणि काहींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर या दिंडीतील लोकांकडे सर्वसामान्य नागरिकांनी धाव घेत या दिंडीला रस्त्याच्या बाजूला घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच दिंडीतील बाकी लोकांची नागरिकांनी आपुलकीने चौकशी केली.

Share This News
error: Content is protected !!