Cyclone

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

604 0

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 500 ते 600 किमी दूर असून ते गुजरातला धडकणार आहे. यादरम्यान मुंबईत वाऱ्याचा वेग 55 ते 60 किलोमीटर प्रती तास राहण्याची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनिल कांबळे यांनी दिली आहे. मुंबई आणि परीसरात पुढील 48 तासांत तुरळक ठिकाणी मेघगर्जानांसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जूनदरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागड, आणि मोरंबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्यानं या भागात चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मच्छिमारांना आवाहन
दरम्यान हवामान विभागाकडून बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान हवामान विभागाकडून बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना देण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!