बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चढ्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याने त्यांचे वेडिंग डेस्टिनेशन (Wedding Destination) देखील ठरवले आहे. सिद्धार्थ कियारा नंतर त्यांच्या लग्नाच्या वेडिंग डेस्टिनेशनची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा ज्या ठिकाणी विवाहबद्ध होणार आहेत त्या पॅलेसचे फोटो चला पाहुयात….
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. यासाठी त्यांनी लग्नाचे ठिकाणही निश्चित केले आहे.
राघव आणि परिणीती यांनी दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये (Kapurthala House) मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला होता. आता राजस्थानमध्ये दोघांचे डेस्टिनेशन वेडिंग पार पडणार आहे. यासाठी त्यांनी एक आलिशान हॉटेल बुक केले आहे. अलीकडेच, हे जोडपे राजस्थानमध्ये स्काउटिंगच्या ठिकाणी स्पॉट झाले होते.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी त्यांच्या लग्नासाठी द ओबेरॉय उदयविलास (The Oberoi Udayavilas) बुक केला आहे. हे हॉटेल उदयपूरच्या पिचोला तलावाच्या काठावर आहे. ओबेरॉय उदयविलास, मेवाडच्या महाराजांचे हॉटेल आहे. हे हॉटेल एका आलिशान राजवाड्यापेक्षा कमी नाही.
तुम्हाला येथे एका खोलीसाठी 35,000 रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर येथील कोहिनूर सूटसाठी एका रात्रीचा खर्च 11 लाख रुपये आहे. हे दोघेही पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांनी जैसलमेरच्या पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले होते. त्यानंतर आता परिणितीच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.