Reels

तुम्ही रील्स पाहण्यासाठी बराच वेळ घालवता का? मग आताच व्हा सावध; नाहीतर होईल ‘हा’ आजार

418 0

पूर्वीच्या काळी मनोरंजनासाठी टीव्हीवर चित्रपट पाहणे, सीरियल पाहणे आणि रेडिओवर गाणी ऐकणे या गोष्टी केल्या जात होत्या. मात्र या गोष्टी आता इतिहास जमा होताना दिसत आहेत. सध्या करमणुकीसाठी तरुणाई रील्स (Reels) पाहण्याकडे वळू लागली आहे. लहान मुलांपासून ते तरुण, वयोवृद्धदेखील रील्स पाहण्यात व्यस्त आहेत. झोपताना-जागताना, खात-पिण्यात, प्रवासात, सगळीकडे रिल्सचा हँगओव्हर असतो. ही तरुणाई Instagram आणि YouTube सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला बराच वेळ घालवताना दिसत आहे. रील्स पाहण्याचे व्यसन लागणे हा आता एक प्रकारचा आजार झाला आहे.

रील्स पाहिल्यामुळे गंभीर परिणाम?
रील्समुळे मोठ्या प्रमाणावर वेळेचा अपव्यय होत आहे. व्हीडिओ पाहण्यात किती तास उलटतात हे लक्षात येत नाही. अशा स्थितीत त्यांचे कामाकडे दुर्लक्ष होत आहे. रील्सच्या व्यवसनामुळे लोक मानसिक आजारी पडत आहेत. लोकांमध्ये डिप्रेशन मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पुष्कळ वेळा रील्स पाहिल्याने अनेकजण स्वतःतील दोष शोधू लागतात. रात्री उशिरापर्यंत रिल्स पाहिल्याने झोप कमी होते. आणि झोप कमी झाल्यामुळे तणाव सुरू होतो. तसेच स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यामुळे डोळे कमकुवत होतात, याशिवाय रील्समुळे शारीरिक हालचालीदेखील कमी होतात. त्यातून लठ्ठपणासारखा आजार होऊ शकतो.

रील्स म्हणजे काय?
रील्स हा इन्स्टाग्रामवरील (Instagram) लहान व्हिडिओचा एक प्रकार आहे. सुरुवातीला हे रील्स 30 सेकंदांच्या कालावधीचे असायचे पण आता ते 90 सेकंदांपर्यंत वाढवण्यात आले आहे. भारतात टिकटॉक बंद झाल्यावर या रील्सचा ट्रेंड सुरू झाला आहे. आजकालची तरुणाई या रील्सकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे. इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोक हे रील्स पाहत असतात.

Share This News

Related Post

आशा भोसले यांचा मुलाला दुबईतील इस्पितळात केलं भरती, अचानक बेशुद्ध होऊन कोसळले

Posted by - April 15, 2022 0
दुबई- आशा भोसले यांचा मुलगा आनंद बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना तातडीने येथील रुग्णालयात भरती…

ऐश्वर्याचा लिप किस करतानाचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल; यूजर म्हणाले, “हे चांगलं नाही…!”

Posted by - November 16, 2022 0
मुंबई : ऐश्वर्या रॉय ही एक विश्वसुंदरी आहे. तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये सर्वोत्तम भूमिका करून आपले अभिनय कौशल्य…

‘खेडवळ’ लूकमध्ये झळकणार अभिनेत्री स्मिता तांबे

Posted by - April 19, 2022 0
नवनवीन भूमिकांतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे. स्मिता आगामी ‘लगन’ या मराठी चित्रपटात आव्हानात्मक भूमिकेत झळकणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *