अमरावती : अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या शेतशिवारात एक शेतकरी रस्त्यानं जात असताना अचानक त्याच्या दुचाकीचा भीषण स्फोट झाला आणि त्याचा त्या आगीत घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. ज्ञानेश्वर उर्फ नंदू मधुकरराव गणगणे (रा माळीपुरा, अचलपूर वय 42 वर्ष) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
काय घडले नेमके?
नंदू गणगणे यांच्या शेतात सध्या पेरणीची लगबग सुरू आहे. मशागतीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. मशागतीदरम्यान अचानक ट्रॅक्टर ना दुरुस्त झाल्यानं काम रखडलं होतं. त्यामुळे नंदू गणगणे हे आपल्या मोपेडवरू ट्रॅक्टर दुरुस्त करण्याचे पहाने आणि इतर सामान घेऊन शेताकडे निघाले होते.
ही दुचाकी सिद्धिविनायक मंगल कार्यालय परिसरात आली, तेव्हा तिचा अचानक स्फोट झाला. यावेळी त्या ठिकाणी रस्त्यावर कुणीही नव्हते. त्यामुळे नंदू गणगणे यांच्यापर्यंत लवकर मदत पोहोचू शकली नाही. अखेर वेळेवर मदत न मिळाल्याने या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.