काही दिवसांपूर्वी अभिनेत्री क्रिती सेननला ओम राऊतनं केलेल्या ‘किस’वरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावरून सोशल मीडियावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. तिरुपती मंदिराबाहेर ओम राऊतनं क्रिती सेननला किस केलं होतं, त्यानंतर हे दोघे प्रचंड वादात सापडले होते. मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर आल्यावर एकमेकांना निरोप देताना ओम राऊत आणि क्रिती यांनी मिठी मारली आणि ओमनं क्रितीला गालावर ‘गुडबाय’ किस केले.
यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. याआधीही अनेकवेळा सेलिब्रिटी खुलेआम किस करण्यावरून वादात सापडले होते चला तर मग अश्या काही सेलेब्रिटींबद्दल जाणून घेऊया…
1) शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेरे यांनाही गर्दीच्या ठिकाणी मंचावर किस करणं महागात पडलं होतं. रिचर्डने शिल्पाला जबरदस्तीने किस केलं होतं. यावेळी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.
2) एका मासिकाच्या कव्हरवर महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांचा फोटो दिसला होता. या फोटोमध्ये पूजा आणि महेश एकमेकांना लिपलॉक करताना दिसले होते. बाप-लेकीला असं करताना पाहून चाहत्यांनी त्यांना त्यावेळी प्रचंड ट्रोल केले होते.
3) अभिनेत्री रेखाने एकदा हृतिक रोशनला त्याच्या हनुवटीवर किस केलं होतं. रेखाच्या या कृत्यामुळे नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले होते.
4) शाहिद कपूर आणि करीना कपूरचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी लीक झाला होता. यामध्ये ते दोघेही लिपलॉक करताना दिसत होते. यानंतर शाहिद आणि करीनाला खूप ट्रोल करण्यात आले होते.
5) क्रिकेट स्टेडियममध्ये सिद्धार्थ मल्ल्याने दीपिका पदुकोणला किस केलं होतं. यामुळे दोघेही मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले होते.
6) गायक मिका सिंगने राखी सावंतला तिच्या वाढदिवशी जबरदस्तीने किस केले यामुळे दोघांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.