सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. या लग्नानंतर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे हनीमून. पण अनेकवेळा हनिमूनला जायची तयारी उत्तम झालेली असते ज्यात पंचतारांकित हॉटेलची बुकिंग असते सर्व गोष्टी खूप मस्त असतात. पण हनिमून जसा पाहिजे तसा रोमँटिक होत नाही. अशा काही तक्रारी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांकडून ऐकायला मिळत असतात. चला तर मग आज आपण हनिमून अधिक रोमँटिक बनवण्यासाठी काय टिप्स फॉलो करायच्या हे जाणून घेणार आहोत….
1) निसर्गाच्या जवळ जा
हे खरे आहे की हनिमूनला जाणारे लोक अशा ठिकाणी जातात जे निसर्गाच्या अगदी जवळ आहे. पण तुम्ही जेव्हा आधीच तयार केलेल्या प्लॅनपेक्षा वेगळे काहीतरी करायला बाहेर जाता तेव्हाही असे काहीतरी करा जे तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात ठेवेल. निसर्गाचा सहवास तुमचे मन शांत करतो. त्यामुळे नवीन लग्न झालेल्या जोडप्याला एकमेकांना अधिक वेळ देता येतो.
2) एकाचवेळी स्टारगेझिंग
तुम्ही शेवटचे गडद आकाशात चमकणारे तारे कधी पाहिले होते हे आठवले का? तुला आठवणार नाही कारण आता इतका वेळ कोणाकडेच नाही. आता जेव्हा तुम्ही हनिमूनला जाल तेव्हा हे काम करा. हा अनुभव तुम्हाला लहानपणीच्या आठवणी करून देईल.
3) लक्झरीचा आनंद घ्या
केवळ लग्नाआधीच जोडीदारावर प्रेम दाखवणे आवश्यक नाही, तर लग्नानंतर हनिमूनलाही तुम्ही असेच करू शकता. तुमच्या जोडीदाराला तुम्ही यावेळी पुन्हा प्रपोज करू शकता. तसेच आपल्या जोडीदाराला अधिक वेळ द्या.
4) तुम्हाला एकमेकांकडून काय हवे आहे
हनिमून ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही तुम्हाला पुढच्या आयुष्यात काय हवंय आणि काय नको याचा विचार करू शकता. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील इच्छा मोकळेपणाने एकमेकांसमोर ठेवू शकता. याचा तुम्हाला भविष्यासाठी फायदा होणार आहे.