बालभारती शिवाय काहीही न वाचलेले देखील विधान भवनात निवडून जातात – राज ठाकरे (व्हिडिओ)

498 0

पुणे- बालभारती पुस्तकाच्या शिवाय काहीही न वाचलेली लोकं विधान भवनात निवडून जातात अशी मिश्किल टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना केली. पुण्यातील एस एम जोशी सभागृहात झालेल्या पुण्यभूषण या दिवाळी अंकाच्या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी राज ठाकरे बोलत होते.

यावेळी बोलताना एअरटेल सारख्या काही मोबाईल कंपन्या मराठी भाषा नकार देत होत्या त्यावेळी त्यांच्या एअरची टेल मनसेने खेचली आणि त्यामुळे आता मोबाईलमध्ये मराठी भाषा दिसतात असे देखील राज ठाकरे म्हणाले.

मागील काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्यासाठी बंगालला गेलो असता बंगालचा मंत्रालयाची बिल्डिंग म्हाडाच्या बिल्डिंगसारखी दिसत होती. जेव्हा मी मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या लिफ्टमध्ये किशोर कुमार यांची बंगाली गाणी लागली. असंच आपल्या भाषेवर ती सर्वांनी प्रेम केलं तर आपली भाषा समृद्ध होईल असे देखील राज ठाकरे म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide