पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.
शासनाने फोन टॅपिंग प्रकरणात समिती नेमली होती. या समितीने अहवाल दिल्यानंतर शासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत.
याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात भारतीय तार अधिनियमन कलम २६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यावर पुण्याचा माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मागच्या सरकारच्या काळात बेकायदा फोन टॅपिंग केल्याच उघड आहे.
यामध्ये जे जे मागच्या सरकारच्या काळात जेसहभागी आहेत त्यांना चौकशीसाठी बोलावणार अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात पत्रकाराना माहिती दिली.
दिलीप वळसे पाटील म्हणाले,रश्मी शुक्ला यांनी पदाचा गैरवापर केला.
विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा आश्वासन दिलेले होते त्या संदर्भातील उच्चस्तरीय समिती नेमून त्याच्या आधारे कारवाई करण्यात येईल अस सांगितलं होतं असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
मागच्या समितीने या प्रकारणारत अहवाल दिला या समितीने शिफारशी केल्या त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.