Suraj Mandhare

शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! 40 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे ACB ला पत्र

637 0

मुंबई : शिक्षण क्षेत्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील 40 शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी एसीबीला दिले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Forest Minister Sudhir Mungantiwar) यांच्या विभागामध्ये पैशाच्या मोबदल्यात बदल्या झाल्याचे समोर येताच शिक्षण क्षेत्रातील अनेकांकडून शिक्षण क्षेत्रात बदलीसाठी होत असलेला भ्रष्टाचार उघड करण्याची मागणी केली जात आहे.

शिक्षकांची खुली चौकशी करण्याची मागणी
शिक्षण विभागात सध्या मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी लाच घेताना पकडले जातात मात्र पुन्हा सेवेत येतात, पुन्हा भ्रष्टाचार करतात पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhare) यांनी एसीबीला पत्र लिहिले आहे. ज्या शिक्षकांवर छापे पडले त्यांची खुली चौकशी करण्याची मागणी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी एसीबीला लिहिलेल्या पत्रात केली आहे. एवढच काय तर शिक्षक बदलीसाठी दरपत्रक देखील ठरल्याच्या चर्चा आहेत. साधी फाईल एका टेबल वरून दुसऱ्या टेबलवर पाठवण्यासाठी देखील पैसे घेतले जातात.

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे (Corruption) दर पत्रक
कायम मुख्याध्यापक मान्यतेसाठी – एक ते दीड लाख रुपये
शालार्थ प्रकरणांसाठी – 80 हजार ते एक लाख रुपये
मेडिकल बिल मंजुरीसाठी – बिलाच्या रकमेच्या पाच ते 20 टक्क्यांपर्यंत
शिक्षक बदलीसाठी – 50 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत

या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आता एसीबीच्या (ACB)चौकशी अजून कोणती माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!