SANJAY RAUT

‘…तर काही दिवसांनी ते रस्त्याने दगड मारत फिरतील’; शिंदे गटाची संजय राऊतांवर टीका

613 0

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमीच शिंदे गट आणि भाजपावर (BJP) रोज टीका करत असतात. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यादरम्यान संजय राऊत यांना श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यासंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी संजय राऊतांनी थू म्हणत थुंकण्याची कृती केली. त्यांच्या या कृतीवरून आता शिंदे गटानं संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Mhaske) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले मस्के ?
‘सत्ता गेल्यानं संजय राऊत हतबल झाले आहेत. आज थुंकत आहेत, थोड्याच दिवसात कपडे काढून रस्त्यावर दगड मारत फिरतील. संजय राऊत यांच्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी’. असे नरेश मस्के म्हणाले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल संजय राऊत यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी थू म्हणत थुंकण्याची कृती केली होती. त्यांच्या या कृतीवरून नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे.

Share This News
error: Content is protected !!