Death

मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईनेही सोडले प्राण; मन सुन्न करणारी घटना

524 0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये मुलाच्या निधनाची बातमी समजताच जन्मदात्या आईनेही आपले प्राण सोडले आहे. आई आणि मुलाच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
निर्हाळे फत्तेपूर (Nirhale Fattepur) येथील रहिवासी असलेले शिवराम फकिरबा सांगळे (Shivram Fakirba Sangle) हे सध्या नवी मुंबईत राहायला होते. सांगळे हे मुबंई येथील अधीक्षक शिक्षण निरीक्षक विभागातून चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. काही दिवसांपासून ते पॅरालिसिसच्या आजाराने त्रस्त असताना बुधवारी सकाळच्या सुमारास त्यांचे अचानक निधन झाले. नातेवाईक त्यांचे शव मुंबईवरुन अंत्यविधीसाठी निऱ्हाळे येथे आणत असताना त्यांच्या निधनाची बातमी आई ठकुबाई (Thakubai) यांच्या कानावर पडली आणि काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यांचाही यामध्ये मृत्यू झाला.

या घटनेमुळे सांगळे कुटुंबीयांवर दुःखाचा दुहेरी डोंगर कोसळला आहे. मुलापाठोपाठ आईनेही जीव सोडल्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यानंतर जाम नदीवरील स्मशानभूमीत आई आणि मुलावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवराम यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, भाऊ, भावजया, नातवंडे, पुतणे, सूना असा मोठा परिवार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!