Raigad Sohala

राज्याभिषेक सोहळ्यातुन ‘हा’ नेता तडकाफडकी रायगडावरून निघून गेला; चर्चाना उधाण

451 0

पुणे : रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा (350th coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj) आज तिथीनुसार साजरा करण्यात आला. मात्र या कार्यक्रमादरम्यान राज्यातील बडा नेता नाराज होऊन तडकाफडकी रायगडावरून निघून गेला. त्यांच्या अचानक निघून जाण्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

काय घडले नेमके?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा राज्य सरकारच्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी न दिल्याने राष्ट्रवादीचे (NCP) खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) नाराज होऊन होऊन तडकाफडकी रायगडावरून निघून गेले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

दिपक केसरकर यांची प्रतिक्रिया
तटकरे यांच्या नाराजीवर मंत्री दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेकाचा सोहळा आहे, त्यात कोणी मानापमानाने येऊ नये. तटकरे हे ज्येष्ठ नेते आहेत. पवारांनी त्यांना थोडे मार्गदर्शन करावे असे मला वाटते. हा सोहळा राजकीय नव्हता, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!