Breaking News
Romance

धावत्या स्कूटरवर दोन तरुणांचा अश्लील रोमान्स; Video आला समोर

715 0

लखनऊ : भर रस्त्यात किंवा पब्लिक प्लेसमध्ये आपण अनेक कपलला रोमान्स (Romance) करताना पाहिले असेल. ही लोक रोमान्स करण्यात एवढी गुंतलेली असता कि त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राहत नाही. मात्र आता सोशल मीडियावर (Social Media) असा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे त्यामध्ये दोन तरुण भररस्त्यात अश्लील कृत्य करताना दिसत आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये?
धावत्या स्कूटरवर लिप लॉक किस करणाऱ्या दोन तरुणांचा एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. तिघे जण स्कूटरवर बसले आहेत. ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांपैकी मागचे दोघं एकमेकांचं चुंबन घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील (Utter Pradesh) आहे. मात्र हे तरुण नेमके कोण आहेत, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. स्कूटरच्या मागून धावणाऱ्या कार चालकाने हा व्हिडिओ शूट केला आहे.

या तिन्ही तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आता पोलीस या तरुणावर कोणती कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!