Sanket Kulkarni Murder Case

अखेर राज्याला हादरवून सोडणाऱ्या संकेत कुलकर्णी हत्याकांडाचा निकाल लागला

795 0

छत्रपती संभाजीनगर : राज्याला हादरवून टाकणाऱ्या संकेत कुलकर्णी हत्याकांडाचा (Sanket Kulkarni murder case) आज निकाल लागला आहे. या प्रकरणात याअगोदर एका आरोपीला जन्मठेप झाली आहे. 23 मार्च 2018 रोजी संकेत कुलकर्णी या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची कारखाली चिरडून निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली होती. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
23 मार्च 2018 रोजी संकेत कुलकर्णी याची कारखाली चिरडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली होती. 23 मार्च 2018 रोजी दुपारी साडेतीन-चार वाजताच्या सुमारास संकेतच्या अंगावरून पाच ते सहा वेळा कार घालून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. संकेत कुलकर्णीवर हल्ला झाल्यानंतर त्याला त्याच्या मित्रांनी तातडीने घाटी रुग्णालयात नेलं, पण तिकडे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

यानंतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धस्तरावर सुरु केला. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी संकेत जायभाय, संकेत मच्चे, उमर पटेल आणि विजय जोग यांना अटक केली होती. खटल्याची सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने 22 साक्षीदार तपासले. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून संकेत जायभाय (Sanket Jaibhai) या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. या निकालावर संकेत कुलकर्णीच्या वडिलांनी माझ्या मुलाला निर्दयीपणे मारणाऱ्या आरोपीला न्यायलयाने शिक्षा सुनावली आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाने समाधानी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!