Ahmadnagar Crime

जमिनीच्या वादावरून सुट्टीवर आलेल्या जवानाला अन् कुटुंबियांना गावगुडांकडून मारहाण

1610 0

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar) एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका जवानाच्या घरावर काही गावगुंडांनी हल्ला केला आहे. त्यांनी त्या जवानाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण (family brutally) केली. या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
अहमदनगर तालुक्यातील जेऊर वाघवाडी येथील राजस्थान बिकानेर 66 मधील तोफखाना युनिटवर कार्यरत असलेल्या जवान महेश गोरक्ष वाघ यांच्यावर हा हल्ला (Beaten) करण्यात आला आहे. गावातील गुंडांनीच हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात महेश वाघ हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने महेश वाघ यांच्यावर हा हल्ला (Land Dispute) करण्यात आला.

काय घडले नेमके?
वडिलोपार्जित 79 गुंठे जागा ही महेश वाघ यांच्या वडिलांच्या नावावर आहे. सदरचा इसम त्रास देतो म्हणून महेशच्या वडिलांनी या जमिनीतून 45.15 फूट जागा त्याच्या नावाने करून दिली. मात्र, जमीन देऊन सुद्धा त्या इसमाने 3 गुंठ्यावर अतिक्रमण केले. याचा जाब विचारण्यासाठी महेश वाघ यांच्यावर गावगुंडांनी हल्ला केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!