Dhule Murder

धुळे हादरलं ! राजकीय वादातून कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या

1473 0

धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये धुळे तालुक्यातील उभंड- पिंपरखेड येथे एका राजकीय कार्यकर्त्याची गोळी झाडून तसेच चाकूने गळा चिरुन निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना काल रात्री 9 वाजता घडली आहे. या हत्याकांडामुळे धुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

काय घडले नेमके?
धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या मिलिंद सोसायटी येथे राहणारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष यशवंत बागुल (Yashwant Bagul) हे त्यांच्या शेतीच्या कामासाठी धुळे तालुक्यातील उभंड या ठिकाणी गेले होते. शेतातील डाळिंबाच्या झाडांना बांबू लावण्यासाठी आणि मजूर शोधण्यासाठी त्यांच्या मामाचा मुलगा व यशवंत बागुल हे शेजारी असलेल्या पिंपरखेड या गावी गेले. त्या ठिकाणाहून परतत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला.

यामध्ये एका आरोपीने बंदुकीतून गोळी झाडली तर दुसऱ्या आरोपीने चाकूने छातीवर व गळ्यावर वार करत यशवंत बागुल यांची निर्घृणपणे हत्या केली. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. यासंदर्भात यशवंत बागुल यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात (Dhule Taluka Police) अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!