75 Rupees Coin

मोदी सरकार आणणार 75 रुपयांचं नाणं; काय आहे याची खासियत?

908 0

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी मोदी सरकार (Modi Government) आणि RBI ने मिळून 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. यानंतर आता मोदी सरकार चलनात 75 रुपयाचं नाणे बाजारात आणणार असल्याचे समजत आहे. 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार यावेळी हे 75 रुपयांचे नाणे (75 rupees coin) लॉंच होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्रालयाकडून (Ministry of Finance) गुरुवारी याबाबत माहिती देण्यात आली आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. याचं महत्त्व आणि हा सुवर्णक्षण या कॉइनद्वारे संपूर्ण भारतात पोहोचवण्यात येणार आहे. या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचा सिंह आणि त्याखाली सत्यमेव जयते असे लिहिलेले आहे. याशिवाय देवनागरी लिपीमध्ये भारत हा शब्द दुसऱ्या बाजूला इंग्रजीमध्ये इंडिया असे लिहिले आहे.

काय आहे या नाण्याची खासियत?
75 रुपयांचे हे नाणे 44 मिलिमीटर व्यासाचे गोलाकार आकाराचे असेल. त्याच्या बाजूला 200 सेरेशन्स असतील. 35 ग्रॅम वजनाचे हे नाणं 4 धातूंपासून तयार करण्यात आलं आहे. या नाण्यामध्ये 50% चांदी, 40% तांबे, 5% निकेल आणि 5% जस्त चा वापर करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!