पुणे : पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आजारपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला आहे. यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला आहे तर मायलेकावर उपचार सुरु आहेत. यामध्ये मुलाला फिट येत असे, तर आईला कर्करोगाने ग्रासले होते याच त्रासाला कंटाळून या तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
काय घडले नेमके?
पुण्यातील हडपसर भागात ही घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आई, वडील आणि मुलगा यांचा समावेश आहे. सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (72)(Surya Prakash Harishchandra Abnave), चेतन अबनावे (40) (Chetan Abnave) आणि जनाबाई अबनावे (60) (Janabai Abnave) अशी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
चेतन अबनावे हा स्वतः आजारी असायचा. त्याला अनेक वेळा फीट येत होत्या. शिवाय त्याच्या आईला कॅन्सर होता. या सततच्या आजारपणाला कंटाळून या तिघांनी आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी सोमवारी संध्याकाळी तिघांनी हडपसर येथील राहत्या घरी जेवणातून विषप्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला तर आई आणि मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.