Pune Murder

भर दिवसा तरुणाची गोळ्या झाडून हत्या! पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरलं

17616 0

पिंपरी-चिंचवड : पुण्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. काही दिवसांपूर्वी तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या परिसरात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware) यांची भर दिवस हत्या (Murder) करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना आता पिंपरी – चिंचवडमध्ये एका तरुणाची भर दिवसा हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर पुन्हा एकदा हादरलं आहे.

या हल्ल्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. चिखली गावामध्ये टाळगाव चिखली कमानीजवळ कृष्णा उर्फ सोन्या तापकीर (Sonya Tapkir) याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यामध्ये सोन्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सोन्यावर नेमका कुणी हल्ला केला याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!