Suicide

बहिणीच्या लग्नानिमित्त माहेरी गेलेल्या महिलेने 8 वर्षांच्या लेकासह आयुष्य संपवलं

5344 0

यवतमाळ : यवतमाळमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये चिमुकल्या मुलासह आईने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना यवतमाळ शहरातील अशोक नगर परिसरात घडली आहे. रेश्मा वंडकर (38) (Reshma Vandkar) आणि पूर्वेश वंडकर (8) (Purvesh Vandkar) (दोघेही रा. सिंहगड रोड कोल्हेवाडी, पुणे, हल्ली मुक्काम अंबिका नगर, यवतमाळ) असे मृत मायलेकाचे नाव आहे. या प्रकरणी रितेश देशभ्रतार (Ritesh Deshbhartar) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
बहिणीचे 14 मे रोजी लग्न असल्याने मोठी ताई रेश्मा वंडकर ही तिचा 8 वर्षीय मुलगा पूर्वेश याच्यासह एक महिन्यापूर्वी यवतमाळ येथे आली होती. रेश्मा हिचा मुलगा गतिमंद असल्याने, उपचार करण्याच्या उद्देशाने तिने मुलासह यवतमाळला राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ती शहरातील अशोक नगर येथे भाड्याने खोली घेऊन राहत होती. यादरम्यान बहिणीचा विवाह झाल्यानंतर तिने शनिवारी दुपारच्या सुमारास अशोक नगर येथील आईच्या घरी कुणी नसल्याचे बघून 8 वर्षीय चिमुकल्यासह गळफास लावून आत्महत्या केली.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच महिला पोलिस उपनिरीक्षक वानखेडे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरून जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करीत आहे.

Share This News

Related Post

No Smoking Day 2023 : जर तुम्ही धूम्रपानामुळे त्रस्त असाल तर या सोप्या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात

Posted by - March 7, 2023 0
देशभरात दरवर्षी 2023 मार्च रोजी ‘नो स्मोकिंग डे’ साजरा केला जातो. धूम्रपानामुळे होणाऱ्या हानीबद्दल लोकांना जागरूक करणे आणि या वाईट…

#ACIDENT : गुगल मॅपने चुकवला रस्ता ! सिंहगडावर फिरायला गेलेल्या तरुण तरुणीवर काळाचा घाला, अपघातात तरुणीचा मृत्यू

Posted by - February 2, 2023 0
पुणे : योग्य मार्ग माहित नसला की आपण सर्रास गुगल मॅपची मदत घेत असतो. पण सिंहगडावर फिरायला गेलेल्या तरुण तरुणीवर…

#CRIME NEWS : मावळमध्ये किरकोळ कारणावरून गावगुंडांची कुटुंबाला फावडे आणि दगडाने बेदम मारहाण; व्हिडिओ झाला व्हायरल !

Posted by - February 14, 2023 0
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल…

१२५ डेसीबलपेक्षा जास्त आवाजाचे साखळी फटाके उडविण्यास मनाई

Posted by - October 21, 2022 0
पुणे : दीपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार पुणे पोलीस…

‘पबजी’ गेमच्या वेडापायी पालघरमध्ये १६ वर्षीय मुलगा इमारतीवरून पडला

Posted by - May 16, 2022 0
पालघर- पबजी खेळताना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने १६ वर्षाचा मुलगा जखमी झाला. पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे रविवारी ही घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *