Chandrapur Crime

‘त्या’ चुकीमुळे चक्क एका कैद्याने पोलिसाला केली बेदम मारहाण (Video)

1462 0

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये (Chandrapur) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये एका आरोपीने चक्क पोलिसाला बेदम मारहाण (brutal beating) केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
चंद्रपूर जिल्हा कारागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून एक कैदी आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. मंगळवारी ( 16 मे ) रोजी अचानक या कैद्याची तब्येत बिघडली. यानंतर एक पोलीस कर्मचारी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेला. मात्र, ज्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रुग्णालयात नेले तो पोलीस स्वतः दारूच्या नशेत होता.

यादरम्यान अचानक या कैद्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याने हॉस्पिटलमध्ये पडलेला झाडू उचलला आणि डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसमोर पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर रुग्णालयातील कर्मचारी आरोपीपासून पोलिसाचे रक्षण करताना दिसत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण रुग्णालयात खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide