Highway

अवघ्या 100 तासांत बांधला 100 किलोमीटरचा गाझियाबाद-अलिगड एक्स्प्रेस वे; गडकरींकडून कौतुक

733 0

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) बुलंदशहर जिल्ह्यात, क्यूब हायवेद्वारे गाझियाबाद-अलिगड राष्ट्रीय द्रुतगती मार्ग (Ghaziabad-Aligarh Expressway) सहा पदरी करण्याचे काम सुरु आहे. यावेळी एनएचएआयने अवघ्या 100 तासात 100 किमीचा रस्ता तयार करून एक अनोखा विश्वविक्रम केला आहे. गाझियाबाद ते अलीगढ दरम्यान हा रस्ता बनवण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Road and Transport Minister Nitin Gadkari) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

गाझियाबाद ते अलीगढ हे अंतर 126 किलोमीटर आहे. या संपूर्ण कामात दोन हजार मजुरांनी न थांबता काम केले. यापूर्वी 75 किलोमीटर लांबीचा रस्ता 100 तासांत बांधण्यात आला होता. हा जागतिक विक्रम आता मोडण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बांधकामाधीन नवीन एक्स्प्रेस वेची छायाचित्रे शेअर करताना या विश्वविक्रमाची माहिती दिली.

हे टार्गेट खूप मोठे होते. त्यासाठी 15 मे रोजी सकाळी 10 वाजता कामाला सुरुवात झाली आणि 19 तारखेला पहाटे 2 वाजता 100 तासांत सुमारे 100 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला, जो एक जागतिक विक्रम (World Record) आहे असे एनएचएआयशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Share This News
error: Content is protected !!