पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे शारीरीक सुखाची मागणी (Physical Relation) करुन तिचा हात पकडून विनयभंग (Molestation) केला आहे. हा आरोपी सदस्य एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या महिलेला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली आहे. या प्रकरणी त्या ग्रामपंचायत सदस्यावर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सचिन गुलाब निकाळजे (Sachin Gulab Nikalje) (रा. कोरेगाव मुळ – Koregaon Mul) असे आरोपी ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. हा सगळी घटना १३ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता व 17 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. 328/23) दाखल केली आहे.
काय घडले नेमके?
घटनेच्या वेळी फिर्यादी या काम करुन घरी जात असताना सचिन निकाळजे याने चारचाकी गाडीतून पाठलाग करुन त्यांना थांबविले. त्यांचा हात पकडून तू मला खूप आवडतेस, तु मला हवी आहेस,असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य केले. यानंतर त्याने फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करुन त्यांची साडी ओढून शरीर सुखाची मागणी केली. यानंतर फिर्यादी महिलेने त्याला धक्का दिला. यानंतर आरोपीने तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर फिर्यादी महिला खूप घाबरली. तिने या घटनेची माहिती आपल्या पतीला दिली. यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक धायगुडे (Sub-Inspector of Police Dhaygude) हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.