2000 Notes And Gold Biscuit

जयपूरच्या सचिवालयाजवळ सापडले ‘घबाड’

525 0

जयपूर : वृत्तसंस्था – काल रात्री रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अचानक दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कालावधीही जाहीर करण्यात आला. या घोषणेनंतर राजस्थानची (Rajsthan) राजधानी जयपूरमध्ये (Jaipur) मोठ्या प्रमाणात दोन हजारांच्या नोटा आणि सोनं सापडलं आहे. राज्य सरकारच्या सचिवालयाजवळ असलेल्या योजना भवनाच्या बेसमेंटमध्ये (Yojana Bhawan Basement) 2 कोटी 31 लाख रुपयांपेक्षा अधिकची रोकड आणि एक किलो वजनाचं सोन्याचं बिस्किट सापडलं आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून गहलोत सरकारवर (Gehlot government) जोरदार निशाणा साधला आहे. योजना विभागाच्या बेसमेंटमध्ये असलेल्या कपाटात हे घबाड सापडलं आहे. त्यात 2000 रुपयांच्या 7,298 नोटा आहेत. या नोटांचे एकूण मूल्य 1 कोटी 45 लाख 96 हजार रुपये इतकं आहे. या कपाटात 500 रुपयांच्या 17 हजार 107 नोटा आढळल्या आहेत. त्यांचं मूल्य 85 लाख 53 हजार 500 रुपये आहे. यासोबतच एक किलो वजनाचं सोन्याचं बिस्किट सापडलं आहे. त्यावर ‘मेड इन स्वित्झर्लंड’ असा उल्लेख आहे. या सोन्याची बाजारातील किंमत 62 लाख रुपयांच्या घरात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!