Rashid Khan

Rashid Khan World Record: वानखेडे स्टेडियमवर राशिद खानने जलवा दाखवत ‘या’ विश्वविक्रमाला घातली गवसणी

486 0

मुंबई : काल मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी अटीतटीची लढत पार पडली. या सामन्यात मुंबईने गुजरातवर मात करत प्ले ऑफची लढत अधिक रंजक बनवली आहे. या सामन्यात अफगाणिस्तनाच्या राशिद खानने (Rashid Khan) आपल्या फिरकीचा जलवा दाखवत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

काय आहेत ते विक्रम?
1) राशिद टी-20 क्रिकेटमध्ये 550 विकेट्स घेणारा जगातील पहिला फिरकीपटू बनला आहे. राशिदने आतापर्यंत टी-20 मध्ये एकूण 551 विकेट घेतले आहेत.
2) तसेच कालच्या सामन्यात राशिदने टी-20 करिअरमधील सर्वात मोठा वैयक्तित स्कोअर केला. राशिदने मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात फक्त 32 चेंडूत 79 धावांची नाबाद खेळी केली.
3) राशिदने या इनिंगमध्ये 10 षटकार आणि 3 चौकार ठोकले. टी-20 क्रिकेटमध्ये 8 व्या नंबरवर फलंदाजी करून सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रमसुद्धा राशिद खानच्या नावावर नोंदवण्यात आला आहे.
4) राशिद आयपीएलच्या इतिहासात नंबर 8 वर फलंदाजी करून सर्वात मोठी इनिंग खेळणारा फलंदाज बनला आहे. या अगोदर हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नावावर होता. त्याने 2021 मध्ये 8 व्या नंबरवर फलंदाजी करून 66 धावा केल्या होत्या.
5) तसेच राशिद आयपीएलमध्ये पराभव झालेल्या सामन्यात चार विकेट आणि अर्धशतकी खेळी करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. याअगोदर ही कामगिरी युवराज सिंग (2011 आणि 2014) (Yuvraj Singh) आणि मिचेल मार्श (2023) (Mitchell Marsh) यांनी केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!