Adah Sharma

Adah Sharma: केरळ स्टोरीच्या अदा शर्मानं आलिया अन् कंगनाला मागे टाकत केला ‘हा’ विक्रम

665 0

मुंबई : सध्या संपूर्ण देशात चर्चेत असलेला सुदीप्तो सेन दिग्दर्शित चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ हा 5 मे रोजी रिलीज झाला. यानंतर या चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच 100 कोटींचा आकडा पार करेल. हा चित्रपट या वर्षातील ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे. मध्यप्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला तर काही राज्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.

या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास हा चित्रपट 3 महिलांवर आधारित आहे. ‘द केरळ स्टोरी’ याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) नवीन विक्रम करत असताना अदा शर्माने देखील नवा विक्रम तिच्या नावावर केला आहे.

काय आहे विक्रम?
अदा शर्माचा (Adah Sharma) चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ने (The Kerala Story) पहिल्या आठवड्यातील कमाईच्या बाबतीत आलिया भट्टचा चित्रपट गंगूबाई काठियावाडीलाही मागं टाकलं आहे. आता द केरळ स्टोरी हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा महिला अभिनेत्रीचा चित्रपट ठरला आहे.

बॉलीवूडच्या (Bollywood) 5 सर्वात मोठ्या महिला-केंद्रित चित्रपटांची कमाई
अदा शर्माचा चित्रपट The Kerala Story – 81.36 कोटी
आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी चित्रपट – 68.82 कोटी
कंगना राणौतचा मणिकर्णिका चित्रपट – 61.15 कोटी
करीना कपूरचा ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपट – 56.96 कोटी
आलिया भट्टचा राझी चित्रपट – 56.59 कोटी

Share This News

Related Post

Baipan Bhaari Deva

Baipan Bhaari Deva : काष्ठी साडी अन् डोक्यावर पदर घेत 80 वर्षांच्या आजींनी सुकन्या मोनेबरोबर घातली भन्नाट फुगडी

Posted by - July 27, 2023 0
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या सिनेमा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या चित्रपटाला लोकांचा उत्स्फूर्त…
Pengaon Pass Away

साऊथ अभिनेता हरीश पेंगनचं वयाच्या 49 व्या वर्षी निधन

Posted by - May 31, 2023 0
मुंबई : मल्याळम चित्रपट अभिनेता हरीश पेंगन यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले आहे. यामुळे चित्रपटसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा…
aadipurush Show

आदिपुरुषचा शो सुरु असताना साक्षात हनुमान प्रकटले

Posted by - June 16, 2023 0
मुंबई : बहुचर्चित आदिपुरूष हा सिनेमा अखेर आज संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. या सिनेमाने रिलीज होण्याआधीच कोटींची कमाई केली आहे.…

#BTS ARMY : J. Hope देखील सैन्यात भरती होणार, जाण्यापूर्वी त्याने चाहत्यांशी संवाद साधला

Posted by - February 26, 2023 0
काही तासांपूर्वी बिगित म्युझिकने आपल्या चाहत्यांना सांगितले होते की, त्यांचा खास सदस्य जय होप लष्करात आहे. यानंतर रविवारी जय होपने…

झुंड सिनेमाबाबत काय म्हणाला अभिनेता रितेश देशमुख…?

Posted by - March 10, 2022 0
झुंड सिनेमाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. नुकतीच रितेश देशमुखनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं झुंड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *