sanjay raut

संजय राऊत यांच्यासारख्या भाडोत्री माणसावर काय बोलणार?; भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका

349 0

नाशिक : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पात्रतेच्या अधिक बोलू नये. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर काय भाष्य करणार, भाडोत्री माणसावर काय बोलणार अशा शब्दांत विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

तसेच संजय राऊत यांनी वर्तवलेली भविष्यवाणी कधीही खरी झालेली नाही. संजय राऊतांकडे दुर्लक्ष करा. पुढे जाऊन त्यांचा पक्ष त्यांच्याबाबत काय करेल माहिती नाही. संजय राऊत म्हणजे वैफल्यग्रस्त झालेला माणूस काही दिवसांनी त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसेल अशी जहरी टीका विखे पाटील यांनी यावेळी केली.

यादरम्यान विखे पाटील यांनी कर्नाटकच्या निवडणुकीवर (Karnatak Election) आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले सुरवातीचे कल येत आहेत. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. आता जे निकाल येत आहेत त्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काही खूप फरक नाही. खूप मोठा फटका नाही पूर्ण निकाल आल्यावर चर्चा होईल.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide