Breaking News

आतापर्यंत हजारो पुणेकर अडकले ‘जॉबट्रॅप’ मध्ये ; सायबर चोरट्यांचा धुमाकूळ (व्हिडीओ)

215 0

पुणे- महिन्याकाठी तब्बल ८५ पुणेकर सायबर चोरट्यांच्या जॉब फ्रॉड ट्रॅपमध्ये अडकल्याचे वास्तव आहे.नामांकित कंपनीत प्लेसमेंट करून देतो, परदेशात अधिक पगाराची नोकरी लावतो असे प्रलोभन दाखवून तरुण-तरुणींना जाळ्यात ओढले जात आहे.

सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना हेरून सायबर चोरटे आपल्या जाळ्यात खेचतांना दिसत आहेत. बेरोजगार तरुण नोकरीसाठी विविध नोकरीविषयक संकेतस्थळावर नोंदणी करतात. पुढे हेच सायबर चोरटे ऑनलाईन नोंदणी केलेल्या तरुणांचे संकेतस्थळावरील मोबाईल क्रमांक मिळवून संपर्क करतात. त्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवतात एकदा का ते जाळ्यात अडकले की चांगला पगार, परदेशात नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये उकळून गंडा घातल्याचे प्रकार समोर आले आहेत.

आपण कशाप्रकारे टाळू शकता फसवणूक जाणून घ्या

* विश्वसनीय व खात्रीशीर वेबसाईट वरच नोकरीसाठी नोंदणी करा.
* आपल्या शिक्षणापेक्षा मोठी नोकरी मिळत असेल तर निश्चित फसवणूक हे सूत्र लक्षात ठेवा.
* अनोळखी व्यक्तींच्या हवाली मुख्य शैक्षणिक कागदपत्रे देऊ नका.
* अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नका.

Share This News
error: Content is protected !!