Breaking News

रजनीश सेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक

251 0

मुंबई- रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

रजनीश सेठ 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. दोन वर्ष मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त होते.

राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक नाही यावरून न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे अखेर सरकारकडून रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!