Kishor Awarae

तळेगाव हादरलं !… भरदिवसा गोळीबार

950 0

पुणे : पुणे येथील तळेगाव या ठिकाणी भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर गोळीबार आणि वार करण्यात आले आहे. यानंतर किशोर आवारे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आवारे यांना दोन गोळ्या लागल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांसह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!