rahul-gandhi

कर्नाटकमध्ये राहुल गांधींचा हटके प्रचार; डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून मारला फेटफटका

582 0

कर्नाटक : येत्या 10 मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. तर, 13 मे रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपा आणि काँग्रेस एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटकात ठाण मांडून बसले आहेत. या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये ते एका डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून फेरफटका मारताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.राहुल गांधींनी डिलीव्हरी बॉयबरोबर दुचाकीवरून 2 किलोमीटर प्रवास केला. यादरम्यान त्यांनी एका चिमुरड्याशी आपुलकीने चर्चा करत, फोटोदेखील काढला.

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बंगळुरूमध्ये आहेत. त्यांनीदेखील या निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान मोदींनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 6 मे रोजी 26 किलोमीटरचा रोड शो केला होता. त्यानंतर आजसुद्धा त्यांनी १० किलोमीटरचा रोड शो केला आहे. त्यांच्या या रोड शो दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक मोठ्या संख्येने फुलं घेऊन उभे होते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने केंद्रीय मंत्र्यासह भाजपशासित राज्यातील मंत्रीही प्रचारात उतरवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात उतरले आहेत. मराठी मते मिळवण्यासाठी भाजपने शिंदे यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे शिंदेचा भाजपला किती फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!