नदीमध्ये पोहोण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला, इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

1992 0

पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला जीव गमवावा लागला. ही घटना मावळ तालुक्यातील कामशेत गावाजवळ घडली. मंगळवारी (ता. ११ ) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

हर्ष लक्ष्मण अडसुळे ( वय १७ रा. दापोडी, पुणे) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दापोडी येथील ५ मित्र फिरण्यासाठी या भागात आले होते. तेव्हा या पाचही जणांना पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर ते सर्वजण इंद्रायणी पात्रात पोहण्यासाठी उतरले. त्यापैकी हर्ष अडसुळे याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलीस आणि वन्यजीव मावळ रक्षक संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि आपदा मित्र मावळ हे घटनास्थळी पोहोचले. पाण्यात बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास यंत्रणांना यश आले.

Share This News
error: Content is protected !!