अंधेरीतील कामगार रुग्णालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी

394 0

अंधेरीतील कामगार रुग्णालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र रुग्णसेवा संघटनेचे व श्रमिक कामगार संघटनेचे सचिव भिमेश मुतुला यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. भारती पवार यांच्याकडे केली आहे.

अंधेरीतील कामगार विमा रूग्णालयात आगीच्या घटनेनंतर अद्याप बंद आहे. त्यामुळे अनेक कामगार लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी महाराष्ट्र रुग्णसेवा संघटनेचे व श्रमिक कामगार संघटनेचे सचिव भिमेश मुतुला यांनी कामगार रुग्णालय चालू करण्याची मागणी केली होती पण संबधित विभागाने याविषयी कुठलेही सकारात्मक पाऊल उचलले नव्हते.

भिमेश मुतुला यांनी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. भारती पवार यांची भेट घेऊन कामगार रुग्णालय पूर्ववत सुरू करण्याबाबत चर्चा केली. आरोग्य मंत्र्यांनी यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!