Breaking News – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात

888 0

मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकी देण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना नेते संजय राऊत, पुण्यातील भाजप नेते गणेश बिडकर, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यानंतर आता थेट मुख्यमंत्र्यांना धमकीचा कॉल आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत धमकीचा कॉल करणाऱ्याला पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना उडवून टाकण्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. काल रात्री हा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. तपासाची सूत्र वेगाने हलवण्यात आली. पोलिसांनी त्वरित फोन कोठून आला, त्याचा शोध घेतला. यावेळी फोन पुणे येथील वारजे येथून आल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मारुती आगवणे असं आरोपीचे नाव आहे. कौटुंबिक वादातून त्याने हा कॉल केला असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. आरोपीची बायको धायरी येथे वास्तव्यास आहे.दोन वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झालेला असून मुलबाळ नाही. तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असे त्याची पत्नी व ओळखीचे लोक सांगत आहेत.

कोण आहे हा मारुती आगवणे ?

आरोपी मारुती आगवणे हा शास्त्रीनगर धारावी येथील रहिवासी आहे. त्याचं वय 42 वर्षे आहे. मुंबईतच वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. त्याची पत्नी कोथरुडला खासगी ठिकाणी काम करते. तिला भेटायला महिन्यातून दोन वेळा येतो.

Share This News
error: Content is protected !!