सिक्कीममध्ये हिमस्खलन होऊन ६ पर्यटकांचा मृत्यू तर अनेकजण बर्फात गाडले गेल्याची भीती

819 0

सिक्कीममध्ये हिमस्खलन होऊन ६ पर्यटकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एक मुलगा यांचा समावेश आहे. ही घटना आज दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी नाथूला बॉर्डर जवळ घडली आहे. बर्फामध्ये अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचावकार्य वेगाने सुरु असून बर्फामध्ये अडकलेल्याना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

नाथुला हे चीन सीमेवरील सर्वात निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणाला अनेक पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटकांना पास दिला जातो. हा पास १३ व्य मैलांपर्यंतच लागू असतो. मात्र पर्यटक विना परवाना १५ व्या मैलांपर्यंत चालत गेले. याच ठिकाणी ही घटना घडली.

घटनास्थळी रेस्क्यू टीम उपस्थित असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. सिक्कीम पोलीस आणि स्थानिक लोक बर्फात अडकलेल्याना शोधून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!