‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ स्वीकारणार काश्मीरमधील दहशतवादग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व पुनीत बालन यांची घोषणा

409 0

पुणे: जम्मू-काश्मीर खोऱ्यातील दहशतवादग्रस्त कुटुंबांतील मुलाचा शोध घेऊन त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने घेतला आहे. याबाबतची माहिती ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी दिली आहे.

ड्रग्ज आणि दहशतवादामुळे ज्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे अशा मुलांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा फाऊंडेशनाचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. आताही दहशतवाद पीडितांना मदत करण्याचा त्यांचा मानस आहे. जम्मू-काश्मिरममधील राजुरी भागात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दहशतवादी घटनेत तेथील लहान मुलांना त्याचा फार मोठा फटका बसला. अशा घटनांनी प्रभावित झालेल्या मुलांपुढे शिक्षणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने अशा दहशतवादग्रस्त कुटुंबांचा शोध घेऊन त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. अतिरेक्यांनी केलेल्या हत्या आणि अनाथ झालेली मुले आणि त्यातून उद्वस्त झालेली कुटुंबं यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पुनीत बालन म्हणाले की, ‘‘फाउंडेशनला या मुलांना शक्य तितकी मदत करायची आहे. इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारचे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. परंतु आम्ही जम्मू आणि काश्मीर निवडले कारण कुणीतरी पु़ढे येऊन अशी सुरवात केली पाहिजे. जेणेकरुन पृथ्वीवरील स्वर्ग असे बिरूद मिरवणाऱ्या काश्मिरमधील मुलांच्या भविष्यात काळोख निर्माण होणार नाही. याची सुरवात आम्ही करत आहोत.’’

दरम्यान ऑगस्ट 2019 मध्ये काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर मुलांचे शिक्षण आणि इतर विकास प्रकल्पांवर काम सुरू करणारे पुनीत बालन पहिले उद्योजक आहेत. काश्मिरी मुलांच्या शिक्षणासाठी ‘नेशन फर्स्ट’ या उपक्रमात फाऊंडेशनने आघाडीची भूमिका बजावली आहे. बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेहगाम आणि गुरेझ या दशहतग्रस्त भागात भारतीय सैन्याने स्थापन केलेल्या 10 शाळा चालवल्या जात आहेत. ते बारामुल्ला येथील डॅगर स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रनला तांत्रिक, शैक्षणिक आणि आर्थिक सहाय्य देखील करत आहे. याशिवाय काश्मिरी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीही पाठिंबा देत आहे. आतापर्यंत, फाऊंडेशनने घाटीतील अशा पाच हजार तरुणांना मदत केली आहे.

फाऊंडेशनच्या पाठिंब्याने मुंबई खेळाडूंसाठी खो-खो खेळणारा उमर अहमद म्हणाला, ‘मी सेना आणि पुनीत बालन यांचा आभारी आहे. मला या फाऊंडेशनने मला सर्वतोपरी मदत केली आहे.’’

विविध राज्यांतील आठ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेले सायकलपटू मोहम्मद सलीम शेख यांनी सांगितले की, ‘‘फाऊंडेशनकडून त्यांना मोठे सहकार्य मिळाले आहे. फाऊंडेशन आणि लष्कराच्या पाठिंब्यामुळे मी मोठी मजल मारु शकलो.’’

Share This News

Related Post

Gondia News

Gondia News : गोंदिया हादरलं! विद्युत मोटर विहिरीत सोडताना शॉक लागून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 28, 2023 0
गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Gondia News) विहिरीमध्ये पाण्याची मोटर टाकत…

काल महाआरती आज पत्रकार परिषद ; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष

Posted by - April 17, 2022 0
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.. काल पुण्यातील खालकर चौकातील हनुमान आरतीवरून आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून…
Katewadi Gaon

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ काटेवाडीमधील ग्रामस्थ आले एकत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Posted by - June 11, 2024 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासाठी बारामतीकरांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार…
Aalandi News

पोलीस-वारकऱ्यांमध्ये झालेल्या झटापटीप्रकरणी पोलीस आयुक्तांनी केला ‘हा’ मोठा दावा

Posted by - June 12, 2023 0
पुणे : मागच्या वर्षीच्या ‘पालखी प्रस्थान सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत काही महिला जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी…

जिल्हा नियोजन समितीची बैठक : पुणे शहरातील 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करणार – पालकमंत्री

Posted by - October 17, 2022 0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *