मास्क लावून, हुडी घालून एटीएम फोडले, पण पोलिसांच्या नजरेतून नाही सुटले

720 0

पिंपरी- स्वतःची ओळख लपवण्यासाठी तोंडावर मास्क लावून, अंगात हुडी घालून, शिवाय डोक्यावर रुमाल टाकून एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोन चोरटयांनी केला खरा, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्ही चोरटे पोलिसांच्या जाळयात अडकले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

चैतन्य चौधरी आणि भानुदास दिघे अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. एटीएम फोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रात्री गस्तीवर असताना पोलिसांना पिंपरीच्या खराळवाडी जवळ एक एटीएम फोडलेल्या अवस्थेत दिसले तर दुसऱ्या एटीएममध्ये संशयित आढळून आले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले मात्र एकजण पळून गेला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्यालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!