मास्क लावून, हुडी घालून एटीएम फोडले, पण पोलिसांच्या नजरेतून नाही सुटले

594 0

पिंपरी- स्वतःची ओळख लपवण्यासाठी तोंडावर मास्क लावून, अंगात हुडी घालून, शिवाय डोक्यावर रुमाल टाकून एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोन चोरटयांनी केला खरा, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्ही चोरटे पोलिसांच्या जाळयात अडकले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

चैतन्य चौधरी आणि भानुदास दिघे अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. एटीएम फोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रात्री गस्तीवर असताना पोलिसांना पिंपरीच्या खराळवाडी जवळ एक एटीएम फोडलेल्या अवस्थेत दिसले तर दुसऱ्या एटीएममध्ये संशयित आढळून आले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले मात्र एकजण पळून गेला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्यालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

Share This News

Related Post

वैज्ञानिक संशोधनात आवड, संयम आणि सातत्य गरजेचे -डॉ.नितीन करमळकर

Posted by - February 23, 2022 0
वैज्ञानिक संशोधन कसे चालते, याची योग्य माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याकरीता इंडस्ट्री आणि महाविद्यालये यामध्ये देवाणघेवाण व समन्वय असणे…

मोठी बातमी! खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक

Posted by - April 23, 2023 0
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याने आत्मसमर्पण केले आहे. त्याने मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त आहे. वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल…

कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद

Posted by - March 17, 2023 0
पुणे दि.१७-कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९…
Suicide

बहिणीच्या लग्नानिमित्त माहेरी गेलेल्या महिलेने 8 वर्षांच्या लेकासह आयुष्य संपवलं

Posted by - May 22, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये चिमुकल्या मुलासह आईने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही…
Kolhapur Crime

मधुमेहाच्या औषधाने केला घात? बायकोने किचनमध्ये तर पतीने भररस्त्यात सोडले प्राण

Posted by - May 31, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध पती- पत्नीच्या जीवावर बेतले आहे. हे दाम्पत्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *