नितीन गडकरी यांना धमकी देणारा जयेश पुजाराकडून मोबाईल आणि सीमकार्ड जप्त; नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले…

489 0

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देणारा आरोपी जयेश पुजारी याच्याकडून धमकी देण्यात आलेला मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्यात आला आहे. बेळगाव जेलमधून आरोपी जयेश पुजारा याच्याकडून दोन मोबाईल, दोन सीम कार्ड जप्त केले असून त्यातील रेकॉर्डस तपासले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्क कार्यालयात फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे.

काल नागपूर पोलिसांनी कर्नाटकात जाऊन बेळगाव जेलची झाडाझडती घेतली. तसेच फोन केलेली व्यक्ती जयेश पुजारा याचा जबाब देखील नोंदवण्यात आला. आता जयेश पुजाराला नागपुरात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिलेले फोन आणि सीमकार्ड जप्त बेळगाव येथून जप्त करण्यात आले आहेत. जानेवारी महिन्यातील धमकी आणि दोन दिवसांपूर्वी दिलेल्या धमकीचे फोन- सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!