पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी रोजच लाखो भाविक येत असतात. त्यामुळे या परिसरात सातत्याने गजबजाट असतोच. अशातच या वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक नियमन करण्याऐवजी वाहन चालकांना थांबवून त्यांच्याकडून वसुलीचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक अनिल कल्लाप्पा जामगे या पोलीस कर्मचाऱ्याचा निलंबन करण्यात आलं आहे.
अनिल जामगे हे फरासखाना वाहतूक शाखेत कार्यरत होते. 11 मार्च रोजी गणेश चतुर्थी होती. या दिवशी त्यांची शिवाजी रोडवरील बुधवार चौक येथे नेमणूक करण्यात आली होती. यावेळी दोघेजण दुचाकी वर सात वाजण्याच्या सुमारास सिग्नलला थांबले होते. या वाहन चालकांकडून दुसऱ्या जिल्ह्यातील दुचाकी पाहून जामगे यांनी त्यांना थांबवलं आणि लायसन्सची मागणी केली. त्यांच्याकडे लायसन्स नसल्याने विना लायसन्स वाहन चालवण्याकरिता 5000 रुपये दंड असल्याच त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर संबंधित गाडीचे मालक हे दुसरे असल्याने आणखी दहा हजार रुपये दंड भरण्यास सांगितल होता. याप्रकरणी तक्रारदार यांच्याकडून पाचशे रुपये रोख आणण्यास सांगून ते पैसे आणण्यासाठी म्हणून एटीएममध्ये गेले होते. परंतु एटीएम नसल्याकारणांना त्यांनी त्यांची गाडी ही वाहतूक विभागात आणली होती.
दरम्यान वरिष्ठ आणि पोलीस अंमलदारांना देखील कारवाई करत असताना परंतु बॉडी कॅमेरा देखील त्यांनी वापरला नव्हता. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन झालं.
दरम्यान त्यादिवशी चतुर्थी होती. त्यामुळे परिसरात अधिक वर्दळ असल्याकारणाने तक्रारदार यांची गाडी अडवून त्यांच्याशी चर्चा करण्यामध्ये विनाकारण वेळ वाया घालवला त्याचबरोबर वाहतूक नियमाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केलं. यामुळे बेशिस्त बेजबाबदार वर्तन केल्याच्या कारणाने अनिल जामगे यांचं निलंबन करण्यात आल आहे.