मोठी बातमी : पुण्यातील कोयता गँगचा म्होरक्या सचिन माने पोलिसांच्या जाळ्यात; नऊ साथीदारांसह कोयते तलवारी जप्त
पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या कोयता गँगचा प्रमुख सचिन माने याला स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. सचिन माने याच्या सह त्याच्या नऊ साथीदारांना देखील अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून कोयते ,तलवारी असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
सचिन माने आणि त्याच्या साथीदारांनी कोयते उगारून परिसरात एकच दहशत माजवली होती. दरम्यान माने हा घोरपडे पेठेत राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची माहिती बातमीदारामार्फत पथकाला मिळाली होती. पोलिसांनी सापळा लावून या सचिन मानेला पकडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर देखील कोयता उगारला असल्याच समजतंय. यामध्ये शिवाजी गायकवाड हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
याप्रकरणी सचिन माने वय वर्ष 24 ,रोहित जाधव वय वर्ष 27 ,अजय ढिखळे वय वर्ष 24 ,यश माने वय वर्ष 18 ,अमर जाधव वय वर्ष 32, विजय ढिकले वय वर्ष 18 ,मोन्या उर्फ सुरज काकडे वय वर्ष 26, निखिल पेटकर वय वर्ष 22 यांना अटक करण्यात आली आहे.
त्याचबरोबर त्यांचा साथीदार पल्या पासंगे 21, आयुष माने वय वर्ष 21, माया उर्फ अभिषेक पाटोळे वर्ष 22, प्रमोद उर्फ पम्या आणि एका अल्पवयी मुलाच्या विरुद्ध मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदुलकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
