पुणे : धायरी, गणेश नगर, गल्ली क्रमांक २२ येथील एका कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून ०८ वाहने दाखल झाली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
पुण्यात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. या कंपनित अचानक मोठा स्फोट झाला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या स्फोटानंतर कंपनीला आग लागली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.